ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 524 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 97 हजार 224 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 185 आणि काश्मीर मधील 339 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 5 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 651 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 89,905 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 36,524 रुग्ण जम्मूतील तर 53,381 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1517 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 512 जण तर काश्मीरमधील 1005 जणांनी आपला जीव गमावला आहे.