देशात मोबाईल नेटवर्कच्या विस्तारात बजावली होती भूमिका
अफगाणिसतानचे माजी माहिती-तंत्रज्ञान मंत्री सैयद अहमद शाह सआदत जर्मनीत पिझ्झाची डिलिव्हरी करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीतील शहर लीपजिंगमध्ये सायकलने पिझ्झा डिलिव्हरी करत आहेत. माहिती-तंत्रज्ञान मंत्री असताना अफगाणिस्तानात मोबाईल नेटवर्कचा विस्तार करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. तालिबानसोबतच्या संघर्षादरम्यान ते जर्मनीत आले होते.
मागील वर्षीच माहिती-तंत्रज्ञान मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. माझ्यात आणि अध्यक्ष अशरफ गनी यांच्यात अनेक मुद्दय़ांवरून मतभेद होते. राजीनामा दिल्यावर सआदत काही काळ देशातच राहिले, पण त्यानंतर त्यांनी जर्मनीत धाव घेतली. तेथे पैसे कमी पडू लागल्यावर त्यांनी पिझ्झा डिलिव्हरीचे काम सुरू केले आहे.