नॉर्दर्न अलायनस आणि तालिबानदरम्यान सत्ता भागीदारी करारावरून चर्चा सुरू आहे. तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानात शरीया कायदा लागू करण्याचा मुद्दा मांडला आहे. तर नॉर्दर्न अलायन्स या मागणीला काही प्रमाणात नियंत्रणात ठेवून लोकशाही प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे.
‘पंजशीर के शेर’ म्हणून ओळखले जाणारे अहमद शाह मसूद यांचे बंधू अहमद वली मसूद यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. एखादा पॉवर शेअरिंग करार होऊ शकतो की नाही याचा सर्वांकडून पंजशीरमध्ये प्रयत्न सुरू आहे. या करारामुळे तालिबानचेही महत्त्व कायम राहणार आणि सर्व वर्गांना सन्मान देखील मिळेल असे अहमद वली मसूद यांनी म्हटले आहे.
प्रत्येकाला स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळावा अशी आमची इच्छा आहे. तालिबानला जर शरीया कायदा आणायचा असल्यास तो त्याने लागू करावा, पण तो कुणावर थोपविला जाऊ नये. तालिबानच्या एखाद्या हिस्स्यात लोकशाहीची इच्छा नसल्यास ती थोपविली जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे.
एकीकडे अहमद वली मसूद यांनी पॉवर शेअरिंग करारावर भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे त्यांचे पुतणे आणि अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांनी तालिबान विरोधात आघाडी उघडली आहे.