उदगाव /वार्ताहर
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये चिंचवाड तालुका शिरोळ येथील शेतकऱ्यांचे वर्चस्व राहिले,यामध्ये जयसिंगपूर सर्कल अंतर्गत भाग घेऊन जास्तीत जास्त उत्पादन घेऊन यश मिळवलेल्या सभासद शेतकरी यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, बक्षीस स्वरूपामध्ये धनादेश देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सुदर्शन आमाण्णा ककडे व व्दितीय क्रमांक भूपाल नरसाप्पा मगदुम यांनी मिळवत चिंचवाड येथील वर्चस्व सिद्ध केले. कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकांना विविध योजना व तंत्रज्ञान या विषयी सातत्याने मार्गदर्शन करण्यात येते याचा लाभ घेत ऊस उत्पादकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत जास्तीत जास्त उत्पादन घेणे घ्यावे असे आवाहन संचालकांच्या वतीने यावेळी करण्यात आले.बक्षीस वितरण प्रसंगी जवाहर कारखान्याचे संचालक गौतम इंगळे, एन. डी. पाटील, आप्पासो तेरदाळे, जयसिंगपूर गट अधिकारी प्रवीण चौगुले, संजय नांदणे, कुमार मगदूम, राजू ककडे, आदिनाथ नांद्रेकर, नंदू शिंदे, अशितोष ककडे, सुशांत मगदूम, सुपार्श्व ककडे यांच्यासह सभासद उपस्थित होते.