ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने होम डेकोर सॉल्युशन – अर्बन लॅडर कंपनीचा 96 टक्के वाटा 182.12 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. रिलायन्स या कंपनीत आणखी 75 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, ही गुंतवणूक डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होऊ शकते.
अर्बन लॅडर हे होम फर्निचर आणि गृह सजावटीचे उत्पादन विक्री करणारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. या कंपनीचे भारतात दिल्ली, पुणे, बेंगळूर आणि चेन्नईमध्ये ऑफलाईन स्टोअर आहेत. तर परदेशातही रिटेल स्टोअर आहेत.
2019 मध्ये अर्बन लॅडर कंपनीचा टर्नओव्हर 434 कोटी होता. कंपनीचा व्यवसाय वाढल्यामुळे त्याचा रिलायन्सच्या फायदा होणार आहे.