उपाध्यक्षपदी मयुरी सुतार यांची निवड झाल्याने आनंदोत्सव
वार्ताहर / जांबोटी
जांबोटी ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी महेश मारुती गुरव यांची सात विरुद्ध पाच मतानी तसेच उपाध्यक्षपदी मयुरी मारुती सुतार यांची सातविरुद्ध सहा मतानी निवड करण्यात आली.
जांबोटी ग्रा. पं. चे अध्यक्षपद सामान्य गटासाठी खुले होते. उपाध्यक्षपद ‘अ’ वर्ग महिलेकरिता राखीव होते. अध्यक्षपद सामान्य वर्गासाठी खुले असल्यामुळे या पदासाठी मोठय़ा प्रमाणात चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी जांबोटी-राजवाडा येथील ग्रा. पं. सदस्य महेश गुरव व ओलमणी येथील ग्रा. पं. सदस्य सुर्यकांत तुकाराम साबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही पदासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष पदासाठी झालेल्या लढतीत महेश गुरव अध्यक्षपद पटकाविले. उपाध्यक्ष पदासाठी जांबोटी-रामापूरपेठ येथील ग्रा. पं. सदस्या मयुरी सुतार विजयी झाल्या.
निवडणूक अधिकारी म्हणून कळसा-भांडुरा योजनेचे कार्यकारी अभियंता व ग्रा. पं. प्रशासक रामकृष्ण मराठे यांनी काम पाहिले. पीडीओ उदयकुमार शिवापुरे यांनी ग्रा. पं. च्यावतीने उभयंत्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. प्रशासक रामकृष्ण मराठे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य विलास देसाई, सुनिल देसाई, पत्रकार हणमंत जगताप, उदयकुमार शिवापुरे, रामकृष्ण मराठे यांची नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांना शुभेच्छा व्यक्त करणारी भाषणे झाली.
विजयानंतर जल्लोष
यावेळी नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य मंजुनाथ मुतगी, अशोक सुतार, ग्रा. पं. सदस्य प्रविणा प्रभाकर साबळे, लक्ष्मी मल्लू मादार, अनुराधा नागराज सडेकर, लक्ष्मी तळवार आदी उपस्थित होते. ग्रा. पं. कार्यदर्शी नारायण पाटील यांनी आभार मानले. निवड होताच समर्थकानी गुलालाची उधळण व फटाक्यांची आताषबाजी करुन विजयोत्सव साजरा केला.