बँका नुकसानीत : सेन्सेक्स 656 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात तिसऱया दिवशी बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. भारतीय बाजारातील ही सलगची दुसरी घसरण राहिली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही जवळपास एक टक्क्यांनी घसरुन बंद झाला आहे.
नियोजित दरांमधील वृद्धीसह अन्य कारणास्तव निर्माण झालेली चिंता यामुळे जागतिक बाजारात घसरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दिग्गज कंपन्यांपैकी मुख्य कंपन्यांच्या मदतीने आयटी, बँक आणि दररोजच्या वापरातील साहित्य बनविणाऱया कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिल्याचे चित्र राहिले होते.
प्रमुख कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 656.04 अंकांनी घसरुन निर्देशांक 60,098.82 वर बंद झाला आहे. असून सेन्सेक्समधील जवळपास 23 समभाग नुकसानीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 174.65 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,938.40 वर बंद झाला आहे. यामधील 50 समभागांपैकी 35 समभाग बुधवारच्या सत्रात घसरणीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.
सेन्सेक्समधील समभागांपैकी इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक 2.85 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये आयटीसी, टीसीएस 1.87 टक्के विप्रो 1.52 तर एचसीएल टेक 1.70 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच एशियन पेन्ट्सचे समभाग 2.71, हिंदुस्थान युनिलिव्हर 2.41, बजाज फायनान्स 2.07 टक्के आणि कोटक बँक यांचे समभाग 1.86 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले आहेत.
शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशातील संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,254.95 कोटी रुपयाच्या मूल्य असणाऱया समभागाची विक्री करण्यात आली आहे. यासह आशियातील अन्य बाजारांमध्ये जपानचा निक्की जवळपास 3 टक्क्यांनी, चीनचा शांघाय कम्पोझिट 0.3 टक्क्यांनी खाली आला आहे.