प्रतिनिधी/ बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) तर्फे शिक्षक दिनानिमित्त पाच शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. रविवार दि. 5 रोजी सकाळी 10.30 वाजता कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राजेंद्र मधाळे (मुख्याध्यापक प्राथमिक मराठी शाळा, गुंजी) मंगला चौगुले (सरकारी प्राथमिक शाळा, हालगा), सुरेश कळ्ळेकर (मुख्याध्यापक विज्ञान विकास हायस्कूल, बेळगाव), अनिल हुंदरे (महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूर), नीता नवरते (सरकारी शाळा, कोनेवाडी) या शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष संजय पाटील व सेपेटरी विजय बनसूर यांनी केले आहे.