300 ठिकाणी अर्ज करूनही पदरी अपयशच
नोकरी मिळविण्यासाठी सद्यकाळात किती खस्ता खाव्या लागतात हे प्रत्येक जण चांगलेच ओळखून आहे. एका युवकाकडे नोकरी नव्हती, त्याने 300 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला होता, पण त्याला यश मिळू शकले नव्हते. स्थिती माणसात बदल घडवून आणते असे म्हटले जाते. अवघड स्थितीत या युवकाने नोकरी मिळविण्यासाठी अनोखी शक्कल लढविली आहे.
मोठी रक्कम केली खर्च
हा प्रकार उत्तर आयर्लंडमधील आहे. तेथील 24 वर्षीय क्रिस हार्किन सप्टेंबर 2019 पासून नोकरीच्या शोधात आहे. क्रिस पदवीधर झाल्यापासून नोकरीच्या शोधात हिंडत आहे. 300 ठिकाणी अर्ज करून देखील त्याला नोकरी मिळू शकलेली नाही. याचमुळे त्याने नोकरीसाठी बिल बोर्ड लावले आहेत. याकरता त्याला मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे.
शहरात झळकविला बिल बोर्ड
त्याने स्वतःचे छायाचित्र असणारा बिलबोर्ड शहरात झळकविला आहे. याकरता त्याला 40 हजारांहून अधिक रकमेचा खर्च आला आहे. या बोर्डावर प्लीज हायर मी म्हणजेच कृपया मला कामावर ठेवून घ्या असे लिहिले होते. याचबरोबर त्याने तीन मुद्दे नमूद केले होते. मी पदवीधर, अनुभवी लेखक आणि कंटेंट क्रिएटर देखील असल्याचे त्याने बोर्डावर लिहिले आहे. बिलबोर्ड झळकवून देखील त्याला अद्याप नोकरी मिळालेली नाही तर जॉबसाठी बिलबोर्ड झक्ळकविण्याकरता त्याला मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे.