प्रतिनिधी/ बेळगाव
दरवर्षीप्रमाणे यंदाही जायंट्स सखीच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त बेळगाव शहरातील वैशाली पंडित, प्रणिता गेंजी, दीपाश्री वीरगौडर, रोहिणी किल्लेकर आणि नवोमी एबाझ कॉरपोल या विविध विषयाच्या शिक्षिकांचा जायंट्स आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून जायंट्सची प्रार्थना म्हणण्यात आली. व्यासपीठावर अध्यक्षा नीता पाटील, फेडरेशन संचालिका ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा चंद्रा चोपडे, माजी अध्यक्षा नम्रता महागावकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत ज्योती अनगोळकर यांनी केले. जायंट्स सखी आदर्श पुरस्कारप्राप्त महिला शिक्षिकांचा सन्मान नीता पाटील, ज्योती अनगोळकर, चंद्रा चोपडे, नम्रता महागावकर यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप नीता पाटील यांनी केला. या कार्यक्रमाला विद्या सरनोबत, लता कंग्राळकर, शीतल नेसरीकर, विद्या बांदिवडेकर, सुलक्षणा शिनोळकर, वरदा अंगडी आणि भाग्यश्री पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शीतल पाटील आणि आभार संचालिका शीतल नेसरीकर यांनी मानले.