एक कोटीचा निधी मंजूर- युवराज नाईक
प्रतिनिधी/. मेढा
जावली तालुक्यात सुसज्ज तालुका स्तरीय क्रिडा संकुल होणार असुन सुमारे पाच कोटी रुपये खर्चाचे या संकुला साठी एक कोटी रूपये निधी मंजुर झाला असल्याची माहिती जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक यांनी दिली.
या तालुका स्तरीय क्रिडा संकुला साठी मेढा व बिभवी या दोन गावाच्या परिसरात नुकतीच जागेची पाहाणी करण्यात आली .या प्रसंगी जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ , जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक , तालुका क्रिडा अधिकारी श्री . कोळी, , क्रिडा कमिटीचे मार्गदर्शक राजेंद्र जाधव , क्रिडा शिक्षक समिर आगलावे , शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष प्रविण देशमुख उपस्थीत होते
तालुका क्रिडा संकुलाचे अध्यक्ष आ . श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे या संकुलाचा लवकरच प्रश्न मार्गी लागेल. राजेंद्र जाधव हे ही यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. या संकुला मध्ये धावण्याचा ट्रक , विविध खेळाची मैदाने , बहुउद्देशीय हॉल , पंचवीस लाखाची खेळाची विविध साहित्य व क्रिडा संकुलास संपुर्ण संरक्षण भिंत अशा प्रकारे सुसज्ज क्रिडा संकुल उभारण्यात येणार आहे . जागेची निश्चिती होताच लगेच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे
खेळासाठी जावली तालुक्याचे वातावरण पोषक असून तालुका, जिल्हा , राज्य व देशपातळीवर खेळाडू निश्चितच चमकावेत , त्यांना सर्व खेळांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे हाच यामागचा शासनाचा उद्देश असल्याचे जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक यांनी सांगीतले.
आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या कमिटीचे अध्यक्ष असून , तहसिलदार राजेंद्र पोळ कार्याध्यक्ष , जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग , गटशिक्षणाधिकारी जावली हे सदस्य असून तालुका क्रिडा अधिकारी हे सचिव आहेत. या मधील सर्व टीम लवकरात लवकर क्रिडा संकुल उभे राहावे यासाठी प्रयत्न शिल आहेत.या क्रिडा संकुलना मुळे जावली तालुक्याच्या पर्यायी मेढयाच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.