प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत गडहिंग्लज तालुक्याने विजेतेपद मिळविले. चंदगड द्वितीय तर राधानगरी तालुका तृतीय आला.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे स्पर्धा पार पडल्या.
जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील,शिक्षणसभापती प्रवीण यादव यांच्या हस्ते व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील,समाजकल्याण सभापती स्वाती सासने,शिक्षणाधिकारी आशा उबाळे राजेश पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धा प्रमुख जे.टी.पाटील, उपशिक्षणाधिकारी बी.एम.कासार,जयश्री जाधव, डी.सी.कुंभार,एम.आय.सुतार, विद्या पाटील,पी.आय.कांबळे, सीमा हेदूर यांनी स्पर्धेचे नियोजन केले. परिक्षक म्हणून दीपक जगदाळे,रविंद्र सुर्वे,सविता कुंभार,दिलीप चव्हाण यांनी काम पाहिले.स्वागत व प्रास्ताविक विस्तार अधिकारी जे.टी.पाटील यांनी केले. डी.सी.कुंभार यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल – मोठा गट अनुक्रमे पहीले तीन क्रमांक
कथाकथन
देवर्डे(आजरा)
खणदाळ(गडहिंग्लज)
चंदगड(चंदगड)
प्रश्नमंजुषा
लिंगणूर(गडहिंग्लज)
तिरवडे(भूदरगड)साळशी (शाहूवाडी)
समूहगीत महिपाळगड(चंदगड)म्हालसवडे (करवीर)कुमार चंदूर
(हातकणंगले)
नाटय़ीकरण
फेजीवडे(राधानगरी)कोदे बु.(गगनबावडा)बसर्गे(चंदगड)
समूहनृत्य कन्या चंदगड (चंदगड),हिटणी
(गडहिंग्लज)असंडोली(गगनबावडा)
लहान गट निकाल
कथाकथन स्पर्धा
तशनीद तहसिलदार(नेसरी)प्रसन्न परीट(टाकवडे)कस्तूरी निकम(सावर्डे दु.)प्रश्नमंजुषा
कुमार कुपवाड(शिरोळ)लिंगणूर
(गडहिंग्लज) मावळे (चंदगड)
नाटय़ीकरण
फेजीवडे(राधानगरी)
रांगोळी(हातकणंगले)निवडे (गगनबावडा)
समूहगीत
गोरंबे(कागल)कुडीत्रे फॅक्टरी
(करवीर)महिपाळगड(चंदगड)
समूहनृत्य
देवरवाडी(चंदगड)
हसूरचंपू (गडहिंग्लज) असंडोली (गगनबावडा)