जिल्हाधिकारी वेंकटेशकुमार यांची उपस्थिती
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती खात्यातर्फे कनकदास जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आर. वेंकटेशकुमार यांनी कनकदास यांच्या भावचित्राचे पूजन करून पुष्पांजली अर्पण केली. याप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, प्रांताधिकारी रविंद करलिंगण्णावर, कन्नड व संस्कृती खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री, कनक संघाचे अध्यक्ष अशोक सदलगी, उपाध्यक्ष के. के. शुंठे, सदस्य शिवाजी शहापूरकर, श्रीकांत हादिमनी, भीमशी खानाप्पगोळ, रेखा दळवाई, व्ही. वाय. यरगट्टी, एल. जी. पुजेरी, बाबू सांबरेकर, सोमशेखर हिट्टणगी आदी उपस्थित होते.