प्रतिनिधी /बेळगाव
श्री गुरुनानक देवजी महाराजांची 553 वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगाव (नॉर्थ) चे सदस्य तसेच समाजसेवक जगजितसिंग बडगुजर (विलिसिंग) यांच्यावतीने नंदन मक्कळ धाम अनाथाश्रम व मल्लिकार्जुन वृद्धाश्रम येथे भोजन वाटप करण्यात आले. यावेळी उमेश हिरोजी, बलराम पाटील, कऱयाप्पा सिप्री आदी उपस्थित होते.