कणकवली/प्रतिनिधी:-
सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीचे मतदान येथील तहसील कार्यालयात सुरू आहे. कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते एका बुथवर तर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते दुसऱ्या बुथवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कणकवलीत १६५ मतदार असल्याने त्या मतदारांना मतदान केंद्रांमध्ये आणण्यासाठी करण्यासाठी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. सकाळी १० वा. पर्यंत ४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवलीत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.