प्रतिनिधी/ सातारा
जिल्हयाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी कट्टीबध्द असलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या आदर्शवत कामकाजामुळे राज्यात नव्हेतर देशपातळीवर नावलौकीक मिळवलेला आहे . 321 शाखांच्या माध्यमातून व 953 विकास सेवा सोसायटयांच्या माध्यमातून शेतक-यांना जमीन तारणावर बँकेमार्फत मोठया प्रमाणावर कर्ज पुरवठा केला जात असून त्याचा लाभ जिल्हयातील लाखो शेतकरी घेत आहेत . शेतक-यांना त्यांनी धारण केलेल्या क्षेत्राचे 7/12 व 8 अ चे उतारे शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन घ्यावे लागतात . शेतक-यांचा यासाठी खुप वेळ व पैसा खर्च होतो .शेतक-यांना तलाठी वेळेत उपलब्ध न झालेने विना कारण हेलपाटे मारावे लागतात शेतक-यांची गरज व निकड असुनही 7/12 वेळेत उपलब्ध न झाल्याने कर्ज प्रकरणे वेळेत होत नाहीत . पर्यायाने शेतक-यांची आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते .
या सर्व अडचणींवर पर्याय म्हणुन शेतक-यांना विना विलंब 7/12 व 8 अ चे उतारे ऑनलाईन मिळणेसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आणि बँकेच्या या प्रयत्नास यश येवून शासनाने वेब पोर्टलद्वारे शेतकरी सभासदांना कर्ज प्रकरणाकरिता 7/12 व 8 अ उतारे उपलब्ध करून देणेसाठी प्रायोगीक तत्वावर महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवड केली आहे . त्यानुसार बँकेने शासनासोबत सामंजस्य करार देखील केलेला असून शेतक-यांना त्यांच्या धारण क्षेत्राच्या 7/12 व 8 अ चे उतारे मिळणेची सुविधा बँकेच्या सर्व शाखेमधून उपलब्ध करणार आहे . प्रारंभी ही सुविधा बँकेच्या विभागीय कार्यालयातून सुरू केली असून लवकरच बँकेच्या सर्व शाखा मधून ही सुविधा दिली जाणार आहे . या सुविधेचा शुभांरभ बँकेचे अध्यक्ष मा . आ .श्री . छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते दि . 14/05/2020 रोजी करण्यात आला . बँकेचे ज्येष्ठ संचालक व जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री मा . ना . श्री . बाळासाहेब पाटील, बँकेचे उपाध्यक्ष मा .श्री . सुनील माने व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित बँकेच्या अध्यक्षसो यांना 7/12 उतारा शासनाच्या ऑनलाईन पोर्टलद्वारे देवून सुविधेचा शुभारंभ करणेत आला .
शासनाचे वेब पोर्टल द्वारे 7/12 व 8 अ बँकेच्या सर्व शाखामधून मिळणेची सुविधा मिळत असल्याने बँक कर्ज प्रकरण निपटारा वेळेत व अधिक गतीने करणेस मदत होणार असून शेतक-यांना वेळेत व पुरेसा कर्ज पुरवठा करणे सोयीचे होणार आहे .त्याचप्रमाणे वाटप व गहाणखत करताना खातेदाराचे धारण क्षेत्र अन्य कर्ज बोजे, इ करार , जप्ती आदेश याबाबत वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध होणेसाठी याचा उपयोग होणार आहे . तसेच शेतकरी सभासदांना तात्काळ 7/12 व 8 अ उतारे उपलब्ध होणार असुन त्यांना कर्ज पुरवठाही विनाविलंब होणार आहे .कर्ज प्रकरणासाठी कर्जदार सभासदांना 7/12 व 8 अ उतारे यांचेसाठी हेलपाटे मारावे लागणार नाही अथवा ताटकळत बसावे लागणार नाही . त्यामुळे या नविन्यपूर्ण सुविधेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले . तसेच यावेळी बँकेचे मा .संचालक ,सातारा जिल्हयाचे पालकमंत्री व सहकार मंत्री मा . श्री . बाळासाहेब पाटील, यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले सातारा जिल्हा बँकेने केलेल्या सात्यत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाचे वेब पोर्टलद्वारे शेतक-यांसाठी ऑनलाईन 7/12 त्वरीत मिळणेची सुविधा शासनाने सातारा जिल्हा बँकेस उपलब्ध करून दिली आहे .याचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेणेचे आवाहन केले .
यावेळी बँकेचे मा . अध्यक्ष, मा .उपाध्यक्ष व सर्व संचालक , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . राजेंद्र सरकाळे, तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी वर्ग इ . मान्यवर उपस्थित होते .