प्रतिनिधी / सातारा :
गत पाच ते सहा महिन्यापासून जिल्हय़ात लसीकरण सुरु असून या कालावधीत काही अपवाद सोडता लसीकरण गतीने झालेले आहे. जिल्हय़ात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्हय़ात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून त्या उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्हय़ात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाख 16 हजार 162 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 11 लाख 1 हजार 723 एवढी आहे. सातारा तालुक्यात 3 लाख 86 हजार 218 एवढे उद्दिष्ट होते ते 100 टक्के पूर्ण झाले असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 6 लाख 13 हजार 815 एवढी झालेली आहे. दुसरा डोसही 59 टक्के पूर्ण झाला असून फक्त 1 लाख 59 हजार 802 नागरिकांनी दुसरा डोस घेतला की 200 टक्के लसीकरण पूर्ण आहे.
कराड तालुका दुसऱ्या क्रमाकांवर
कराड तालुक्यात 4 लाख 45 हजार 164 लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 5 लाख 96 हजार 413 एवढी झालेली आहे. त्यापैकी 3 लाख 88 हजार 430 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 88 टक्के लसीकरण पूर्ण झालेय. तर 2 लाख 7 हजार 983 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 56 हजार 734 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 2 लाख 37 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
फलटण तालुका तिसऱ्या क्रमांकावर
फलटण तालुक्यात 2 लाख 58 हजार 458 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 3 लाख 39 हजार 433 एवढी आहे. यामध्ये 2 लाख 29 हजार 154 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 1 लाख 10 हजार 279 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 29 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 48 हजार 179 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.