प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी दुपारी एक वाजेपर्यंत 8 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये चंदगड तालुक्यात चार, भुदरगड तालुक्यात एक, त्याचबरोबर शाहुवाडी तालुक्यातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 391 वर पोहोचली आहे.