प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलिसांनी नागेवाडी येथील कॅनॉलच्या जवळ गणेश बाळकृष्ण सावंत हा त्याच्या घराच्या बाजूलाच दारु विकताना पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून 624 रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. कण्हेर येथे सतीश बजरंग वाघमळे हा घराच्या आडोशाला दारु विकताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 572 रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.
तसेच मेढा पोलिसांनी बिभवी येथे गारवा ढाब्याच्या पाठीमागे संतोष बबन लोखंडे (वय 40, रा. मेढा) याच्यावर कारवाई करुन त्याच्याकडून 6410 रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. रहिमतपूर पोलिसांनी कोंबडवाडी येथे आशिष तुकाराम चव्हाण (वय 36, रा. कोंबडवाडी) याच्यावर कारवाई करुन 900 रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.