कोल्हापूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात आज गुरुवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कोरोनाने शिरोळ तालुक्यातील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज दुपारी बारा पर्यंत १७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील सात, करवीर तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील तिघांचा समावेश आहे.
शहरातील फुलेवाडी येथील १५ वर्षीय मुलगा, करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील २४ वर्षे तरुण, चिंचवड येथील १८ वर्षे तरुण, गांधीनगर येथील ४५ वर्षीय महिला, कसबा बावडा येथील ३२ वर्षीय तरुण, करवीर तालुक्यातील येथील कुडित्रे येथील ५५ वर्षीय पुरुष, शहरातील रुईकर कॉलनी येथील ३२ वर्षे तरुण, गांधीनगर येथील ४३ वर्षीय पुरुष, ६१ वर्षीय महिला, कर्नाटक बेळगाव येथील ८२ वर्षीय महिला, इचरकंजी येथील ३० वर्षे तरुण, शाहूपुरी पाच बंगला येथे ५६, वर्षे पुरुष राजारामपुरीतील ३६, वर्षीय महिला करवीर तालुक्यातील ४९ वर्षीय पुरुष, हुपरी येथील माळी गल्ली येथील ५१ वर्षीय पुरुष, रमणमळा येथील छत्रपती कॉलनीतील १९ वर्षीय तरुण, हुपरी येथील धनगर गल्लीतील ७० वर्षीय वृद्ध यांचा समावेश आहे.