अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 25 डिसेंबर 2021, दुपारी 12.00
●पॉझिटिव्हीटी 1.04 टक्के
●नमुने 2115 जणांचे घेतले
●ओमिक्रॉन बाधितांची तब्बेत ठणठणीत
●रात्रीचा कर्फ्युचा जिल्ह्यात उपयोगच नाही
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात नव्याने कोरोनाबाधित व्यक्ती आढळून येण्याचे प्रमाण स्थिर आहे. जिल्ह्यात कालच्या अहवालात 22 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. 2115 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून पॉझिटिव्हीटी 1.04 वर आहे.
जिल्ह्यात बाधित संख्या स्थिर
मागील 24 दिवस सातारा जिल्ह्यातील बाधित वाढ ही 25 च्या खाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला ओमिक्रॉन व्हेरिएंट आला अन् त्यानुसार परदेशातून आलेल्यांची शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यामध्ये 686 जण प्रवास करून आल्याचे निदर्शनास आले असून त्यापैकी 670 जणाच्या घरापर्यंत प्रशासन पोहचले. प्रशासनाने त्यातील 393 जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्यात 5 जण कोरोनाबाधित असून त्यातील 3 जण ओमिक्रॉनबाधित असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.
नाईट कर्फ्युचा जिल्ह्यात उपयोग नाही
आधीच जनता लॉकडाऊनला वैतागली आहे. कोरोनाने माणूस एकमेकांपासून तुटला गेला आहे. अनेकांचे व्यवसाय थांबले आहेत. दररोज नव्याने येणाऱ्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य यंत्रणेने नाईट कर्फ्यु लागू केला आहे. मात्र हा कर्फ्यु सातारा जिल्ह्यातील जनतेला नको आहे. कारण थंडीमुळे सायंकाळी सात वाजताच शटर डाऊन केले जाते. प्रशासन बंधने लादत असली तरी ती नको आहेत, अशी मागणी होत आहे.
शनिवारी
नमुने-2115
बाधित-22
शनिवारपर्यंत
नमुने-23,62,337
बाधित-2,52,366
मृत्यू-6,492
मुक्त-2,44,873