अचूक बातमी “तरुण भारत”ची, शनिवार 26 मार्च 2022, सकाळी 11.00
● तीन तालुक्यात 4 बाधित
● सक्रिय रुग्ण 19 च्या खाली
● 591 जणांची स्वॅब तपासणी तर पॉझिटिव्हीटी 0.68
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना बाधित वाढ मंदावली आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. तरीही नव्याने बाधित आढळून येणारे रुग्ण हे हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे आढळून येतात. तेही ठणठणीत बरे होत आहेत. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 591 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आले. त्यातील 4 जण नव्याने बाधित आढळून आले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 0.68 वर आलेला आहे.
जिल्हा पूर्वपदावर
गत दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले होते. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात भयकंप सुरू झाला होता. पहिल्या लाटेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत जिल्ह्यातील नागरिकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. काही जण चुकीच्या उपचार पद्धतीमुळे तर काहींना योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. गोरगरिबांचे उपासमारीने बेहाल झाले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन ज्या ज्या मार्गदर्शक सूचना जाहीर करत होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात होत होती. ‘तरुण भारत’ने जे चुकीचे आहे त्यावर प्रकाश टाकला. लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. आता जिल्हा 15 मार्च पासून कोरोनामुक्त झाला असून अजून ही नव्याने हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे बाधित आढळून येत आहेत. जिल्हा पूर्व पदावर येत आहे.
तीन तालुक्यातील 4 बाधित
शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात जिल्ह्यातील 4 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये माण तालुका 1, कराड तालुका 2, सातारा तालुका 1 असे 4 जण बाधित नव्याने आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 79 हजार 192 जण बाधित संख्या झालेली आहे.
स्वॅब तपासणी 591 जणांची
जिल्ह्यात दररोज ज्यांना संशय वाटतो अशाच रुग्णांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये काल दिवसभरात 591 जणांची स्वॅब तपासणी केल्याने जिल्ह्यातील आतापर्यंत स्वॅब तपासणी करणारे 25 लाख 69 हजार 878 झाले आहेत.
सक्रिय रुग्ण मोजकेच
जिल्ह्यातील नव्याने बाधित आढळून येणारे रुग्ण हे मोजकेच आहेत त्याच प्रमाणात बरे होणारे रुग्ण ही मोजकेच आहेत. काल 19 जण सक्रिय रुग्ण होते तर त्यातील केवळ 2 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. एकाची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 97.35 वर होता. कोरोनामुक्त 12 जण झाले होते.
शनिवारी
स्वाब-591
बाधित-4
शनिवारपर्यंत
नमुने-25,69,878
बाधित-2,79,192
मृत्यू-6683
मुक्त-2,71,789