प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हा पोलीस अधिक्षकपदी नव्याने रुजू झालेल्या अजयकुमार बन्सल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जिल्हय़ातील आढावा सध्या घेत असून गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाला सूचना देण्यात आल्याचे सांगितले. सध्या जुगार, मटका व अवैध व्यवसायांवर धडक कारवाया सुरु असून 163 केसेस करण्यात आल्या आहेत. पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात तेच काम पारदर्शकपणे केले जाईल. गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यासाठी दोनपेक्षा जास्त गुन्हे करणाऱयांची यादी तयार करण्यात आली असून त्यातील टॉपटेन 1153 गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी आपला धडक कामाचा इरादा स्पष्ट केला.
जिल्हय़ात पोलीस दलाने अनेक गुन्हय़ांचा तपास यशस्वीपणे केला असून काही कारवाया देखील सुरु असून या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पोलीस मुख्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी सहाय्यक पोलीस अधिक्षक आंचल दलाल, गृह पोलीस उपअधिक्षक राजेंद्र साळंखे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बंसल पुढे म्हणाले, सातारा जिह्याचा मोठा लौकीक असून या जिह्यात चुकीचे धंदे व चुकीची माणसे खपवून घेतली जाणार नाही. जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱयांनी, कर्मचाऱयांनी मिळून कारवाईचा सपाटा लावला आहे. चोऱयांचे आठ गुन्हे उघडकीस आणले. त्यात जबरी चोरीचे चार गुन्हे होते. तसेच कराड येथील सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक गुजरात या राज्यामध्ये एटीएममध्ये छेडछाड करून पैसे काढून पळणारी परराज्यातील टोळीला शाहूपुरी पोलिसांनी हरियाणा मधून अटक केली आहे.
सातारा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने कोल्हापूर, राधानगरी, इचलकरंजी, रहिमतपूर, सातारा शहर, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रक चोरी करणाऱया सराईत गुन्हेगार आजिम पठाण याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलिसांनी अवैध शस्त्रs बाळगणाऱयांना अटक केली आहे. जिह्यातील फरार असलेल्या संशयितांना तातडीने अटक केली जाईल तसेच गेल्या दहा दिवसात पाच फरार संशयितांना अटक केली आहे. जिह्यात महिलांच्या बाबतीतील गुह्यांना वाचा फोडण्याबाबत सक्त सूचना केल्या असून त्याबाबत गस्त वाढवण्याच्या सूचना पोलीस ठाण्यांना व निर्भया पथकांना केल्या आहेत.
जिह्याच्या कार्यभार घेतल्यापासून आम्ही सर्व टीम जिह्यातील सराईत गुन्हेगारांची माहिती गोळा करत आहोत. वारंवार गुन्हे करणाऱया सराईत गुन्हेगारांना तसेच दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत जिह्यातील एकूण दोन हजार 766 गुन्हेगारांचा समावेश असून त्यातील त्यातील 1 हजार 153 गुन्हेगार हे टॉप टेन या वर्गवारीत आहेत. त्यांच्यावर पोलिसांच्याकडून कायम निगराणी ठेवली जाईल.
सातारा जिह्यातून हद्दपार केलेल्यांना जिह्याची दारे हद्दपारी संपेपर्यंत बंद राहतील तसेच जे तडीपार हद्दपारीच्या काळात जिह्यात आढळून येथील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्याचाच भाग म्हणून पुसेगाव येथील नितीन भिमराव खरात याला तडीपारी आदेशाचा भंग केल्याने अटक केली असून कराड येथील सराईत गुन्हेगार अमीर शेख याच्यावर झोपडपट्टी दादा निर्मुलन कायद्याने कारवाई केली आहे.