प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील 1665 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल अद्याप यायचे आहेत, अशी माहिती जिल्हा सर्वेक्षण विभागाने शनिवारी रात्री एका पत्रकाद्वारे दिली आहे.
आरोग्य विभागाने 6 हजार 619 जणांच्या आरोग्यावर आतापर्यंत लक्ष ठेवले आहे. यापैकी 4 हजार 8 जणांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 62 जणांवर विलगीकरण विभागात उपचार करण्यात येत आहेत.
1267 जणांनी चौदा दिवसांची तर 1282 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. जिल्हय़ातील 5 हजार 317 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. 3 हजार 354 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 73 पॉझिटिव्ह आले असून यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.