34 नवे रुग्ण, चार तालुक्यात एकही बाधित नाही
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या घटती आहे. रविवारी 34 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनावर मात केलेल्या 43 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले आहे. तर चार तालुक्मयात एकही बाधित आढळून आला नाही.
श्रीराम कॉलनी, अनगोळ, टिळकवाडी, जेएनएमसी कॅम्पस, रिसालदार गल्ली, लक्ष्मीटेकडी, सहय़ाद्रीनगर, संभाजीनगर-वडगाव, शाहूनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये लहान मुले व वृद्धांचाही समावेश आहे.
रविवारी अथणी तालुक्मयात 2, बेळगाव तालुक्मयात 19, चिकोडी तालुक्मयात 8, गोकाक, रामदुर्ग तालुक्मयात प्रत्येकी 1 व रायबाग तालुक्मयात 2 रुग्ण आढळून आले आहेत. बैलहोंगल, हुक्केरी, खानापूर व सौंदत्ती तालुक्मयात एकही बाधित आढळून आला नाही. अद्याप 5 हजार 329 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.
आतापर्यंत जिल्हय़ातील 11 लाख 89 हजार 341 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 11 लाख 410 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 79 हजार 34 वर पोहोचला आहे. यापैकी 77 हजार 710 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मृतांचा सरकारी आकडा 886 इतका असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.