प्रतिनिधी/ बेळगाव
परप्रांतीय कामगार आणि नागरिकांना रेशन पुरवठा कार्यास जिल्हय़ातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवार दि. 26 ते शनिवार दि. 30 पर्यंत बेळगाव जिल्हय़ात 951 परप्रांतियांनी रेशनवरील तांदूळ घेतला आहे. जिल्हय़ातील परप्रांतियांना (शनिवारपर्यंत) 47.55 क्विंटलचे तांदुळ वाटप करण्यात आले. रविवारीही परप्रांतियांना रेशन पुरवठा करण्यात येणार आहे. या आधी शनिवार दि. 30 पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. मात्र, रविवारचा घोषित करण्यात आलेला जनता कर्फ्यु रद्द करण्यात आल्याने रेशनचा पुरवठा रविवारीही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी कळविले आहे.
बेळगाव तालुक्यातील परप्रांतियांनी सर्वाधिक रेशन मिळविले आहे. तालुक्यात 360 परप्रांतीय कुटुंबीयांना रेशनचा लाभ मिळाला असून त्यांना 18 क्विंटल तांदुळ वाटप करण्यात आला आहे. सर्वात कमी रेशन पुरवठा हुक्केरी तालुक्यात झाला असून या ठिकाणी 9 परप्रांतियांनी (0.45 क्विंटल) शनिवारपर्यंत रेशन घेतले आहे. खानापूर तालुक्यात 15 जणांनी (0.75 क्विंटल), अथणी 16 जण (0.8 क्विंटल), बैलहोंगल तालुका 77 जण (3.85 क्विंटल), चिकोडी तालुका 162 जण (8.1 क्विंटल), गोकाक तालुका 80 जण (4 क्विंटल), रामदुर्ग तालुक्यात 73 परप्रांतियांना रेशन पुरवठा करण्यात आला असून (3.65 क्विंटल), रायबाग तालुक्यात 105 (5.25 क्विंटल) आणि सौंदत्ती तालुक्यात 54 परप्रांतियांना रेशन पुरवठा करण्यात आला असून (2.7 क्विंटल) तांदळाचे वाटप झाले आहे. जून महिन्यातही रेशन पुरवठा होणार असून दि. 5 जूनपासून रेशन दुकानांतून पुरवठय़ास सुरुवात होणार असून अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱयांनी कळविले आहे.