24 जणांना डिस्चार्ज : एकूण 4 हजार 910 जण कोरोनामुक्त
सक्रिय रुग्णांची संख्या 231 : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात सोमवारी आणखी 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 24 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 231 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ात नव्याने 19 कोरोना रुग्ण आढळल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 285 झाली आहे. तसेच 24 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत एकूण 4 हजार 910 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात 231 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
सोमवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 19, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 231, उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण 6, आजअखेर बरे झालेले रुग्ण 4 हजार 910, आजअखेर मृत झालेले रुग्ण 144, आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 5 हजार 251, पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण 6.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण – देवगड -368, दोडामार्ग – 276, कणकवली – 1628, कुडाळ – 1182, मालवण – 443, सावंतवाडी – 742, वैभववाडी – 149, वेंगुर्ले – 484, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 13.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण – देवगड – 28, दोडामार्ग – 16, कणकवली – 49, कुडाळ – 33, मालवण – 10, सावंतवाडी – 64, वैभववाडी – 6, वेंगुर्ले – 25.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू – देवगड तालुक्मयातील एकूण – 9, दोडामार्ग – 3, कणकवली- 35, कुडाळ – 26, मालवण – 15, सावंतवाडी – 37, वैभववाडी – 7, वेंगुर्ले – 11, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 1.
आजचे कोरोना टेस्ट नमुने 275, एकूण 25 हजार 697 पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3 हजार 755, ऍन्टिजेन टेस्ट आजचे 25, एकूण 17 हजार 039, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 1658. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 3, ऑक्सिजनवर असणारे – 3, व्हेंटिलेटरवर असणारे – 2.