आणखी सातजण पॉझिटिव्ह : कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 70
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात शुक्रवार आणि शनिवारी मिळून एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 70 वर पोहोचली आहे, तर एकूण रुग्णसंख्या 242 झाली आहे. दरम्यान शनिवारी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत एकूण 166 रुग्ण कोरेनावर मात करून सुखरुप घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी शनिवारी येथे दिली.
शुक्रवारी रात्री उशिराने पॉझिटिव्ह आलेल्या सहा रुग्णांमध्ये कणकवली तालुक्मयातील ओझरम येथील एक, देवगड तालुक्मयातील देवगड येथील दोन व आंबेरी येथील एक तसेच कुडाळ तालुक्मयातील पाट येथील दोघांचा समावेश आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या सात रुग्णांबाबत मात्र ते कुठल्या भागातील आहेत, याची माहिती समजू शकली नाही.
देवगड तालुक्मयातील शिरगाव अनभवणेवाडी येथील अभय वासुदेव नाटळकर यांच्या घरापुरता परिसर 16 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कुडाळ तालुक्मयातील पाट मडवळवाडी येथील 500 मीटर परिसर 17 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. पिंगुळी गोंधळपूर व मुस्लीमवाडी येथील 500 मीटर परिसर 8 जुलैपर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
या क्षेत्रामधील सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री जाहीर करण्यात आलेल्या दिनांकापर्यंत बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4139
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4064
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 242
निगेटिव्ह आलेले नमुने 3822
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 75
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 70
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 166
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 95
शनिवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 2022
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 16155
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 32
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13675
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2448
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 121537