कोरोना चाचणी : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांकडून सूचना
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
शिमगोत्सवाला परजिल्हय़ातून येणाऱयांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले असल्याने कोरोना चाचणी न करता जिल्हय़ात आल्यास आलेल्या दिवशीच कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी बुधवारी येथे दिली.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परजिल्हय़ातून येणाऱया नागरिकांनी 72 तासापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच या उत्सवाविषयीच्या सविस्तर सूचना जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केल्या आहेत. त्या अनुषंगाने परजिल्हय़ातून येतेवेळी आरटीपीसीआर चाचणी करणे शक्मय न झाल्यास नागरिकांनी जिल्हय़ात दाखल होताच त्याच दिवशी संबंधित गावातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथे स्वॅब टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.
जिल्हय़ातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे स्वॅब टेस्टची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वॅब टेस्टचा अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित व्यक्तींनी गृह अलगीकरणात राहावे. स्वॅब टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्याने पुढील उपचाराची कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे.