48 नवे रुग्ण, 529 सक्रिय रुग्ण
बेळगाव : सोमवारी जिल्हय़ातील 83 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले. गेल्या तीन दिवसात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सोमवारी 48 नवे रुग्ण आढळले आहेत.
जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 78 हजार 320 इतका झाला आहे. यापैकी 76 हजार 926 जणांनी कोरोनावर मात केली. सध्या 529 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत असून मृतांचा सरकारी आकडा 865 वर आहे.
दरम्यान गेल्या 24 तासात जिल्हय़ातील 2,947 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 1,623 जणांचे अहवाल यायचे आहेत. सोमवारी सौंदत्ती, रायबाग, खानापूर तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. बेळगाव तालुक्मयातील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.