प्रतिनिधी / रत्नागिरी
अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा शनिवारी संपली आणि जिल्हय़ात 5 रूग्णालयात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरूवात झाली. प्रत्यक्ष लस देण्यापूर्वी कोविन ऍप डाऊन असल्याने जिल्हा रूग्णालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र काही मिनिटात सर्व सुरळीत झाले. मात्र यामुळे नियोजित वेळेपेक्षा लसीकरण शुभारंभाला थोडा उशिर झाला. जिल्हय़ात पहिल्या दिवशी एकूण 261 आरोग्य कर्मचाऱयांना लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या उपस्थितीत 3 महिला वैद्यकीय अधिकाऱयांनी सर्वप्रथम कोविड लस घेतली. त्यानंतर सर्व कर्मचारी स्टाफला ही लस देण्यात आली. सुमारे 65 कर्मचाऱयांना ही लस देण्यात आली.मुळात पहिल्या दिवशी लस घेण्यात काही कर्मचाऱयांची उदासीनताही दिसली, मात्र सुरुवातीला 25 कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱयांनी लस घेतल्यानंतर या लसीकरणाला प्रतिसाद दिला. तरी काही कर्मचारी अनुपस्थित होते.
कामथे, अडरेत 51 जणांना लस
कामथे येथील बाळासाहेब माटे उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, सभापती धनश्री शिंदे यांच्याहस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पहिला डोस अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.यतीन मयेकर यांना देण्यात आला. त्यानंतर कामथे रूग्णालयासह अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचाऱयांना लस देण्यात आली. कोरोना विरूध्दच्या लढाईत महत्वपूर्ण योगदान देणाऱया आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, शिपाई व इतर कर्मचाऱयांना ही लस देण्यात आली. अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मयेकर यांना पहिली लस दिल्यानंतर कामथे रूग्णालयातील 88 आणि अडरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 12 जणांना ही लस देण्यात आली. लस दिल्यानंतर अर्धा तास थांबवून नंतर सर्वांना घरी पाठवण्यात आले.
राजापुरात 42 जणाना लस
राजापूर ग्रामीण रूग्णालयात पहिल्या दिवशी 42 जणांना लस देण्यात आली. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील अधिपरिचारीका माधुरी आसबे यांना सर्वात पहिल्यांदा लस देण्यात आली. या रूग्णालयात 42 आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. यात 14 पुरूष तर 28 महिलांचा समावेश आहे.
गुहारात डॉ. बळवंत पहिले
गुहागरमध्ये कोविशील्ड लस दाखल आली असून शनिवारी गुहागर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यार्थप्रकाश बळवंत यांना पहिली लस देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयंत दाभोळकर यांना लस देण्यात आली. एकूण 56 जणाना लसीकरण झाले. तिघांना काही आजारांमुळे लससाठी नाकारण्यात आली.
( पान 1 ला चौकट घेणे )
दापोलीत साडेतीन तास उशिर
दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा शुभारंभ शनिवारी उत्साहात पार पडला. मात्र येथे दुपारी 12.30 वाजेपर्यंत लसीकरण सुरू झाल्याने लाभार्थींनी खासगीत नाराजी व्यक्त केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवदास चव्हाण यांना दापोली तालुक्यातील पहिली कोरोनाची लस टोचून या मोहिमेचा शुभारंभ केला. पहिल्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय व आसूद प्राथमिक आरोग्य केंद्र येथील 100 आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. उपजिल्हा रूग्णालयातील 64 तर आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील 36 आरोग्य कर्मचाऱयांना ही लस दिली गेली. काहींनी खासगीत नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरीत कोविन ऍप डाऊनमुळे गोंधळ
रत्नागिरीत लसीकरण शुभारंभाआधीच कोविन ऍप डाऊन झाल्याने लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱयांची संपर्कासाठी तारांबळ उडाली होती. लस घेणाऱयांना मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत होते, मात्र अचानक हा ऍप डाऊन झाल्याने थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. असे असले तरी रुग्णालयाच्या टीमने ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून घेऊन लसीकरण सुरळीत सुरू केले. असे झाले लसीकरणः