सुरळीत वीजपुरवठय़ासाठी व्यवस्थेत होणार बदल, बेळगाव शहर, तालुक्मयाला मिळाली 5 स्टेशन, मच्छे स्टेशनची क्षमता 220 केव्ही होणार
सुशांत कुरंगी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील वीज व्यवस्था सुरळीत व्हावी या उद्देशाने जिल्हय़ात नव्या 35 विद्युत स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी बेळगाव शहर व तालुक्मयात 5 स्टेशनचा समावेश आहे. खानापूर तालुक्मयात कोडचवाड येथे विद्युत स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे विजेचे विकेंद्रीकरण होऊन सुरळीत वीजपुरवठा करणे शक्मय होणार आहे. केपीटीसीएलने मंजुरी दिली असल्याने जागा निश्चिती करून लवकरच या स्टेशन उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे.
बेळगाव तालुक्मयात 220 केव्ही स्टेशनची मोठी गरज होती. बऱयाचवेळी हिंडाल्को येथील 220 केव्ही स्टेशनमध्ये बिघाड झाल्यानंतर शहर अंधारात जात होते. हे टाळण्यासाठी तालुक्मयाच्या दक्षिण भागात 220 केव्ही स्टेशन गरजेचे होते. यामुळे अर्ध्या तालुक्मयाला अल्टरनेटीव्ह वीजपुरवठा केला जाऊ शकतो. अखेर मच्छे येथे हे 220 केव्ही स्टेशन होणार आहे. याचसोबत नावगे, वंटमुरी, किल्ला, सदाशिवनगर व मच्छे अशी नवीन स्टेशन उभारली जाणार आहेत.
सदाशिवनगर, किल्ला व वंटमुरी येथे होणार 110 केव्ही स्टेशन
शहर तसेच तालुक्मयातील 33 केव्ही स्टेशनची क्षमता वाढविण्यात आली आहे. वंटमुरी गावानजीक 110 केव्ही स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे तालुक्मयाच्या उत्तर भागात वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. शहरातील दोन स्टेशनची क्षमता वाढविली जाणार आहे. किल्ला येथील 33 केव्ही स्टेशनला 110 केव्ही स्टेशन बनविले जाणार आहे. सदाशिवनगर येथील 33 केव्ही स्टेशनला देखील 110 केव्ही बनविले जाणार आहे.
बेळगावमधील औद्योगिक वसाहत शहराबाहेर जाऊ लागली आहे. नावगे, मच्छे, किणये रोड या परिसरात औद्योगिक वसाहत वाढत आहे. उद्योगांना सुरळीत वीजपुरवठय़ाची आवश्यकता असते. मागील चार ते पाच वर्षांत उद्योग क्षेत्र वाढत असल्याने नावगे परिसरात स्टेशन उभे करण्याची मागणी उद्योजकांनी केली होती. या संदर्भात हेस्कॉमच्या वरि÷ अधिकाऱयांना निवेदने देण्यात आली होती. याचे फलित म्हणून नावगे परिसरात 110 केव्ही स्टेशन उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
अल्टरनेटीव्ह वीजपुरवठा
बेळगाव शहर व तालुक्मयाला हिंडाल्को येथील 220 केव्ही स्टेशनमधून वीजपुरवठा होतो. धारवाडनजीकच्या ‘नरेंद्र’ येथील वीजकेंद्रातून हिंडाल्को येथील केपीटीसीएलच्या स्टेशनमध्ये वीजपुरवठा करण्यात येतो. या स्टेशनमध्ये बिघाड झाल्यास शहर अंधारात जात होते. त्यामुळे तालुक्मयाच्या दक्षिण भागात 220 केव्ही स्टेशनसाठी चाचपणी सुरू होती. पहिल्यांदा देसूर येथे जागेची पाहणी झाली. त्यानंतर यरमाळ व नंदीहळ्ळी येथील शेतवडीत जागा निश्चित करण्यात आली. परंतु पॉवर ट्रान्सफॉर्मर जाण्यास योग्य रस्ता नसल्याने अखेर व्हीटीयू नजीकच्या मच्छे स्टेशनमध्ये 220 केव्ही स्टेशन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एका स्टेशनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱया स्टेशनमधून अल्टरनेटीव्ह वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
वीजपुरवठा सुरळीत ठेवणे शक्मय होणार !
बेळगाव जिल्हय़ामध्ये 35 स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही 110 केव्ही असणारी स्टेशन्स 220 केव्हीत रूपांतरित केली जाणार आहेत. यामुळे जिल्हय़ातील नागरिक, उद्योग व्यवसायांना चांगल्या दर्जाचा वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे. तसेच एखाद्या स्टेशनमध्ये बिघाड झाल्यास दुसऱया स्टेशनमधून पुरवठा करून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यास शक्मय होणार असल्याचे संतोषकुमार (कार्यकारी अभियंता केपीटीसीएल- मेजर वर्क) यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
मंजूर झालेल्या स्टेशनचे नाव | तालुका |
110 केव्ही, नावगे | बेळगाव |
110 केव्ही, किल्ला | बेळगाव |
110 केव्ही, सदाशिवनगर | बेळगाव |
220 केव्ही, मच्छे | बेळगाव |
110 केव्ही, वंटमुरी | बेळगाव |
110 केव्ही, सब स्टेशन, कोडचवाड | खानापूर |
220 केव्ही, एकस | हुक्केरी |
110 केव्ही, सुलतानपूर | हुक्केरी |
110 केव्ही, सब स्टेशन बेल्लद बागेवाडी | चिकोडी |
110 केव्ही, करोशी | चिकोडी |
110 केव्ही, होसूर | बैलहोंगल |
110 केव्ही, तिगडी | बैलहेंगल |
110 केव्ही, तुरूकर शिगेहळ्ळी | बैलहोंगल |
110 केव्ही, गोसबळ | गोकाक |
110 केव्ही, घोडगेरी (कोण्णूर) | गोकाक |
110 केव्ही, अरळीमट्टी | गोकाक |
110 केव्ही, तुक्कानट्टी | गोकाक |
110 केव्ही, तिगडी | गोकाक |
110 केव्ही, खनगाव | गोकाक |
110 केव्ही, हडगीनहाळ | गोकाक |
110 केव्ही, हळ्ळूर | गोकाक |
110 केव्ही, मांगनूर | रामदुर्ग |
220 केव्ही, रामदुर्ग (सालहळ्ळी) | रामदुर्ग |
110 केव्ही, दिग्गेवाडी | रायबाग |
110 केव्ही, रायबाग रोड हारुगेरी | रायबाग |
110 केव्ही, बोमनाळ | रायबाग |
110 केव्ही, मुगळखोड | रायबाग |
110 केव्ही, बस्तवाड | रायबाग |
110 केव्ही, इटनाळ | सौंदत्ती |
110 केव्ही, मुगळीहाळ | सौंदत्ती |
110 केव्ही, मल्लूर | सौंदत्ती |
110 केव्ही, शिवापूर | सौंदत्ती |
110 केव्ही, हनमापूर | अथणी |
110 केव्ही, संक्रट्टी | अथणी |
मंजूर झालेल्या स्टेशनचे नाव | तालुका |
110 केव्ही, नावगे | बेळगाव |
110 केव्ही, किल्ला | बेळगाव |
110 केव्ही, सदाशिवनगर | बेळगाव |
220 केव्ही, मच्छे | बेळगाव |
110 केव्ही, वंटमुरी | बेळगाव |
110 केव्ही, सब स्टेशन, कोडचवाड | खानापूर |
220 केव्ही, एकस | हुक्केरी |
110 केव्ही, सुलतानपूर | हुक्केरी |
110 केव्ही, सब स्टेशन बेल्लद बागेवाडी | चिकोडी |
110 केव्ही, करोशी | चिकोडी |
110 केव्ही, होसूर | बैलहोंगल |
110 केव्ही, तिगडी | बैलहेंगल |
110 केव्ही, तुरूकर शिगेहळ्ळी | बैलहोंगल |
110 केव्ही, गोसबळ | गोकाक |
110 केव्ही, घोडगेरी (कोण्णूर) | गोकाक |
110 केव्ही, अरळीमट्टी | गोकाक |
110 केव्ही, तुक्कानट्टी | गोकाक |
110 केव्ही, तिगडी | गोकाक |
110 केव्ही, खनगाव | गोकाक |
110 केव्ही, हडगीनहाळ | गोकाक |
110 केव्ही, हळ्ळूर | गोकाक |
110 केव्ही, मांगनूर | रामदुर्ग |
220 केव्ही, रामदुर्ग (सालहळ्ळी) | रामदुर्ग |
110 केव्ही, दिग्गेवाडी | रायबाग |
110 केव्ही, रायबाग रोड हारुगेरी | रायबाग |
110 केव्ही, बोमनाळ | रायबाग |
110 केव्ही, मुगळखोड | रायबाग |
110 केव्ही, बस्तवाड | रायबाग |
110 केव्ही, इटनाळ | सौंदत्ती |
110 केव्ही, मुगळीहाळ | सौंदत्ती |
110 केव्ही, मल्लूर | सौंदत्ती |
110 केव्ही, शिवापूर | सौंदत्ती |
110 केव्ही, हनमापूर | अथणी |
110 केव्ही, संक्रट्टी | अथणी |