दहा दिवस क्वारंटाईनसाठी येण्याची मुदत संपली : आता कोविड चाचणी करूनच जिल्हय़ात देणार प्रवेश
- जिल्हय़ात आणखी 16 पॉझिटिव्ह
- 12 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
- एकूण 376 जण कोरोना मुक्त
- पॉझिटिव्ह रुग्ण 538, सक्रिय रुग्ण 154
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यांना दहा दिवस ‘होम क्वारंटाईन’ची 12 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत संपली आहे. या 12 दिवसांत जिल्हय़ात 35 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. आता 13 ऑगस्टपासून येणाऱयांना कोविड-19 चाचणी करूनच यावे लागणार आहे. दरम्यान जिल्हय़ात बुधवारी नव्याने 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ात लाखो चाकरमानी येतात. परंतु यावेळी कोरोनाचे सावट असल्याने गणेशोत्सवासाठी येणाऱयांना 14 दिवस क्वारंटाईन राहवे लागणार हेते. अखेर त्यात शासनाने सवलत देत 12 ऑगस्टपर्यंत जिल्हय़ात येणाऱयांना 14 ऐवजी 10 दिवसच होमक्वारंटाईन राहाण्याची सवलत दिली. या सवलतीच्या दिवसात 1 ते 12 ऑगस्टपर्यंत जिल्हय़ात 35 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. परंतु जिल्हय़ात तत्पूर्वी मे ते जुलै या तीन महिन्यांत 1 लाख 60 हजार चाकरमानी दाखल झाले होते. त्यातील काहीजण मुंबईला परतले. परंतु बहुतांश चाकरमानी जिल्हय़ातच आहेत. आता 12 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदत संपली असून 13 ऑगस्टपासून जिल्हय़ात येणाऱयांना जिल्हय़ात आगमनाच्या 48 तास अगोदर कोविड-19 चाचणी करून यावे लागणार आहे. हा चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक राहणार आहे. तसेच त्यांना तीन दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
जिल्हय़ात आणखी 16 पॉझिटिव्ह
जिल्हय़ात बुधवारी नव्याने 16 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात कणकवली तालुक्मयातील खारेपाटण – आठ, कणकवली – एक, हळवल – एक, फोंडा – एक, वैभववाडी – दोन, देवगड तालुक्मयातील पडेल – एक, मालवण तालुक्मयातील तळगाव – एक, तर सावंतवाडी तालुक्मयातील माडखोल येथील एका रुग्णाचा समावेश आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 538 झाली आहे.
बाराजणांना डिस्चार्ज
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण आढळत असले, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. बुधवारी आणखी 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत एकूण 376 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच आठजणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
कंटेनमेंट झोन
सावंतवाडी तालुक्मयातील सातार्डा-देऊळवाडी प्राथमिक शाळा नं. 1 येथील राहुल परशुराम गोवेकर यांच्या घरालगतच्या 15 मीटर परिघ क्षेत्राचा परिसर, सोनुर्ली गावठाणवाडी नं. 1 येथील सूर्यकांत नागेश कुडतरकर यांच्या घरालगतचा 50 मीटर परिघ क्षेत्राचा परिसर तसेच मालवण तालुक्मयातील बिळवस येथील भोगलेवाडीमधील घर क्रमांक 577 चा परिसर व कट्टा येथील ग्रामपंचायत कट्टा मधील रुम क्र. 2 चा परिसर आणि तळगाव येथील महाळुंगेवाडी घर क्र. 458 च्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या कंटेनमेंट झोनमध्ये 24 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 8452
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 538
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 7640
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 274
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 154
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 376
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 20696
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3999
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 195527
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 56