सूरज मुल्ला/ आटपाडी
मेंढपाळांसाठी आस्मितेचा विषय बनलेला आटपाडीतील सोमनाथ जाधव या कष्टकऱयाचा बकरा सध्या चर्चेत आहे. अवघ्या 6 महिने वय असलेल्या आणि 16लाखाला मागणी झालेला हा बकरा शनिवारी चोरीला गेला. बकरा मालकासह मेंढपाळांच्या डोळय़ात आश्रुच्या धारा लागला. हा बकरा पकडण्यासाठी आटपाडी पोलीसांनीही जिल्हा पोलीसप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली भावनेचा प्रश्न म्हणुन बकऱयाचा तपास अवघ्या 47 तासात लावला.
आटपाडीतील आंबेबनमळा नं.2 येथील सोमनाथ जाधव हे मेंढपाळ शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सुमारे 22 माडग्याळी जातीच्या मेंढय़ा आहेत. यातील सांगोला तालुक्यातील मेटकरी यांचा दीड कोटींची किंमत असलेल्या मोदी बकऱयाचे वंश असलेले पिल्लु सोमनाथ जाधव यांच्याकडे आहे. ते त्याला दररोज दुध, बदाम, शेंगदाणे, गुळ असा खुराक चारतात. आटपाडीच्या प्रसिध्द कार्तिक पौर्णिमेच्या जनावरांच्या बाजारात या आकर्षक बकऱयाला तब्बल 16लाख रूपयांची मागणी आली.
हा बकरा पाहण्यासाठी दररोज महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मेंढपाळ, हौसी पशुपालक येत होते. शनिवारी पहाटे अडीच वाजता हा बकरा फिल्मी स्टाईलने चारचाकी गाडीतुन चोरून नेण्यात आला. प्रसिध्द बकरा चोरीला जाण्याच्या घटनेने खळबळ माजली. अनेकांच्या डोळय़ात अश्रु दाटले. युवा नेते दत्तात्रय पाटील यांनी तपासासाठी विशेष पुढाकार घेतला. पोलीसांनी नियमीत चोऱयांपेक्षा हा विषय वेगळा असल्याचे जाणत जिव्हाळय़ाची बाब म्हणुन तपासाला गती दिली.
नियोजनबध्द बकरा चोरीचा तपास करत अवघ्या 47तासात पोलीसांनी बकरा आणि तो चोरणारे आटपाडीतीलच 3 चोरटे जेरबध्द केले. पोलीसांनी केलेल्या कामगिरीने सोमनाथ जाधव यांच्या डोळय़ात आनंदाश्रु तरळले. सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासुन शेकडो मेढपाळांनी गर्दी करत पोलीस अधिकारी व तपास करणाऱया पोलीसांचा गौरव केला.
फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत मेंढपाळांनी 16लाखाचा कौतुकाचा विषय बनलेला बकरा चोरीचा छडा लागल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. पोलीस ठाण्यापासुन आटपाडी शहरातुन वाजत-गाजत बकऱयासह मिरवणुक काढली. निवडणुकीतील विजयापेक्षाही बकरा सापडल्याचा आनंदोत्सव लक्षवेधी ठरला. बकरा चोरीला गेल्याने शरिरात त्राण नसलेले सोमनाथ जाधव यांना बकऱयाचे दर्शन होताच अंगात प्राण आले.
उत्साह, स्फुर्ती, आनंदोत्सव, जिव्हाळा आणि प्रेम याचे प्रतिक म्हणुन आटपाडीतील हा बकऱयाचा विषय लक्षवेधी ठरला. चोरीला गेलेला बकरा शोधुन काढण्याचे काम पोलीसांनी केल्यानंतर त्यांनाही गौरवाचा अनोखा सोहळा प्रेरणा देणारा ठरला. तर एक बकरा कौतुकाचा विषय असु शकतो, हे आटपाडीतील 16लाखाची किंमत असलेल्या सोमनाथ जाधव यांच्या बकऱयाने सिध्द केले असुन त्याचा आनंदोत्सव सर्वच मेंढपाळांसाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे.
मेंढय़ा आणि मेंढपाळांचे प्रेम
सोमनाथ जाधव यांचा बकरा चोरीला गेल्यानंतर त्यांच्यासह अनेक मेंढपाळांच्या डोळय़ात अश्रु आले. एकमेकांच्या गळय़ात पडुन अनेकजण रडले. आणि बकरा चोरीचा छडा लागल्यानंतर एकमेकांना पेढा भरवुन सर्वांनीच आनंद केला. बेधुंद होवुन गुलालासह जल्लोष केला. चोरीला गेलेला बकरा जेंव्हा मालक सोमनाथ यांच्यासमोर आला तेंव्हा त्यांनी त्याला घट्ट मिठ्ठी मारली. हा बकरा जेंव्हा अन्य मेंढय़ांच्या जवळ गेला त्यावेळी सर्वच मुक्या प्राण्यांनी या बकऱयाला जणु अलिंगन दिले.