रुग्णसंख्या घटतीच, गुरुवारी 42 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. गुरुवारी 42 नवे रुग्ण आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या 24 हजार 585 वर पोहोचली आहे. तर संपूर्ण जिह्यात केवळ 543 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटीनमधील माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरांतील 9 व ग्रामीण भागातील 1 असे बेळगाव तालुक्मयातील दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्या 43 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 23 हजार 711 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
प्रशासनाला अद्याप 1 हजार 453 अहवालांची प्रतिक्षा आहे. दरम्यान रामदुर्ग तालुक्मयातील 48 वषीय कोरोना बाधिताचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असून मृतांचा सरकारी आकडा 331 वर पोहोचला आहे. 27 हजार 742 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 17 हजार 78 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 89 हजार 713 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गुरूवारी काकती, कोनवाळ गल्ली, राणी चन्नम्मानगर, भाग्यनगर, सदाशिवनगर, रामतीर्थनगर, गणेशपूर, शहापूर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे साहजिकच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत चालला आहे. तरीही प्रशासनाने स्वॅब तपासणीचा वेग कायम ठेवला आहे.