सातारा प्रतिनिधी
यावर्षी एकीकडे कोरोना तर दुसरीकडे पावसाचा कहर अशी स्थिती होती. मात्र, पावसाने कहर थांबवला. पावसाचा वेग मंदावला असून महापुराचे संकट यावर्षी आले नाही मात्र कोरोनाचे संकट जाता जाईना अशी स्थिती झाली असून कोरोनाचे वाढते आकडे ऐकून देखील आता धडकी भरणे बंद झाले आहे. कोरोनाविषयी सोशल मिडियासह नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा असून त्यातच सुरु असलेल्या गणेशोत्सवात नागरिक विघ्नहर्त्याला ’या कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अन सर्व पुन्हा पुर्वीसारखे सुरु होऊ दे’ अशी प्रार्थना करत आहेत. या स्थितीत बाधितांचा वेग मोठया प्रमाणावर वाढत असली तरी मंगळवारी कोरोनामुक्तांच्या संख्येने 6 हजारांचा ओलांडलेला टप्पा दिलासादायक ठरला आहे.
दरम्यान, जिह्यात सोमवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार 496 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात … मालिका एवढय़ा नागरिकांचा अहवाल बाधित आला आहे तर 218 एवढय़ा नागरिकांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
जिह्यातील 218 जणांची कोरोनावर मत
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ङकराडङतालुक्यातील 47, ङखंडाळाङ तालुक्यातील 19, ङखटावङ तालुक्यातील 13, ङकोरेगावङ तालुक्यातील 8, ङमाणङ तालुक्यातील 9, ङपाटणङ तालुक्यातील 24, ङफलटणङ तालुक्यातील 1, ङसाताराङ तालुक्यातील 55, वाई तालुक्यातील 42 असे एकूण 218 नागरिकांचा समावेश आहे.
जिल्हय़ात 9 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालयात म्हसवड ता. माण 65 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, प्रतापसिंहनगर, सातारा 69 वर्षीय महिला, सातारा 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण 65 वर्षीय पुरुष, कोलवडी ता. कोरेगाव 62 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा 61 वर्षीय पुरुष, अमृतवाडी ता. वाई 48 वर्षीय पुरुष, तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये राहटणी ता. खटाव 60 वर्षीय पुरुष असे एकूण 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
कराड व साताऱयात चिंता अन दिलासा
कराड हे जिल्हय़ातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेले असताना आता सातारा हॉटस्पॉट झाले आहे. सातारा, कराड तालुक्यात बाधितांची संख्या जास्त दिसत असली तरी कोरोनामुक्तीचा वेगही चांगला चिंता अन दिलासा अशी स्थिती आहे. कराड 2628, सातारा 1966 तर तिसऱया स्थानावर वाई 1015 व त्या खालोखाल खंडाळा तालुक्यात 704, फलटण 631, कोरेगाव 609, जावली 609, पाटण 557, खटाव 436, महाबळेश्वर 392 तर माण 256 ही सध्यस्थिती असली तरी यापैकी 6 हजारांच्या वर रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचारार्थ रुग्णांची संख्या 4383 आहे. फलटण, खटाव, खंडाळय़ात वाढ सुरुच असून जावलीत बाधित वाढण्याचा वेग मंदावला आहे तर संसर्ग साखळय़ा तुटल्या आहेत. माण, महाबळेश्वरमध्ये परिस्थिती आटोक्यात आहे.
कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे सहस्त्रक
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण झाले. कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी घरी सोडण्यात आलेल्या 45 कोरोनामुक्तांमुळे कराड तालुक्यातील कोरोनामुक्तीचा आकडा 1012 इतका झाला आहे. कोरोनामुक्तीच्या लढय़ात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सातारा जिह्यात कोरोनाचा मोठा कहर सुरु असून त्यामध्ये मोठय़ा संख्येने कोरोना बाधित रूग्ण वाढत असतानाच कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीसाठी दिलेले योगदान अभूतपूर्व ठरत आहे.
पाटण पंचायत समितीत 9 कर्मचारी बाधीत
पाटण ग्रामीण रूग्णालयात मंगळवारी स्थानिकांसह पंचायत समिती सभापती व काही कर्मचारी यांच्या कोरोना ऍन्टीजेन चाचण्या घेण्यात आल्या. या एकून 78 चाचण्यात दहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला यात पंचायत समिती मधील आठ कर्मचारयांचा समावेश आहे. बाधीतांवर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना इन्स्टीटय़ुशल अथवा होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
जिल्हय़ात 1048 होम आयसोलेट
जिल्हय़ात एकूण उपचारार्थ बाधित रुग्णांची संख्या 4382 असली तरी त्यापैकी 1048 लक्षणे नसलेले पण बाधित अहवाल आलेले नागरिक होम आयसोलेशनमध्ये आहेत. आरोग्य विभागाने त्यांच्याकडे असलेल्या सुविधानंतर त्यांना हा पर्याय दिला असल्याने कोरोना केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये 3,334 एवढे रुग्णांवर उपचार सुरु आहेत. होम आयसोलेट रुग्णांना सर्व मार्गदर्शन करण्यात आले असून आरोग्य सेविका व आशा वर्कर त्यांच्या संपर्कात आहेत. यातील काहीजणांचा 10 दिवसांचा कालावधी संपत आला असून ते देखील कोरोनामुक्त होतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी ’तरुण भारत’ शी बोलताना दिली.
864 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 88, उपजिल्हा रुग्णालय फलटण 142, कोरेगांव 23, वाई 76, खंडाळा 84, रायगांव 33, पानमळेवाडी 159, मायणी 54, महाबळेश्वर 25, दहिवडी 33 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 132 असे एकूण 864 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,