प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात एसटी कर्मचाऱयांकडून मंगळवारी आक्रमक पवित्रा घेत 100 टक्के संप करण्यात आल़ा जिह्यातील एसटीचे 4 हजार 300 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़ यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर सोबतच वर्कशॉप, टायर रिमोल्डींग कर्मचाऱयांचाही सहभाग आह़े संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचे दुसऱया दिवशीही हाल झाल़े
कोरोनामुळे बंद असलेली एसटीची वाहतूक नुकतीच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली होत़ी यातच कर्मचाऱयांनी संपाचे हत्यार उपसल्याने एसटीला प्रतिदिन 70 हजार रूपयांचा फटका बसत आह़े तर मंगळवारी सकाळपासूनच एसटीचे कर्मचारी विभागीय वाहतूक कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होत़े यावेळी कर्मचाऱयांकडून मागण्यांसदर्भात जोरदार घोषणा देण्यात आल्य़ा संपात सर्व संघटना सहभागी झाल्या असून कर्मचाऱयांमध्ये एकजूट असल्याचे दिसत आह़े
एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे तसेच नियमित वेतन द्यावे, आदी मागण्या या कर्मचाऱयांकडून करण्यात येत आहेत़ यासाठी मुंबई उच्च न्यायायातही दाद मागण्यात आली आह़े एसटी कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी एसटीच्या सर्व फेऱया रद्द करण्यात आल्य़ा संपाची माहिती प्रवशांना अनेकांनी आपला प्रवास रद्द केल़ा तर खासगी वाहतुकीचा पर्यायही काहींकडून निवडण्यात आल़ा
जिह्यात एसटीच्या 616 मार्गावरील फेऱयांना संपाचा फटका बसला तर सुमारे 70 लाख रूपयांचे प्रतिदिन नुकसान होत आह़े कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या एसटी प्रशासनाला या संपामुळे नुकसानीला समोर जावे लागत आह़े राज्यभर चालणारा हा संप संपण्याची चिन्ह सध्या दिसून येत नसल्याने आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आह़े तसेच ऐन सणासुदीच्या दिवसात खरेदीसाठी बाहेर पडणाऱया नागरिकांना या संपामुळे नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आह़े मंगळवारी पुन्हा एकदा एसटी कर्मचारी रत्नागिरीतील माळनाका येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलनाला बसले होत़े यावेळी कर्मचाऱयांकडून घोषणाबाजी करण्यात आल़ी तसेच विविध मागण्या करण्यात आल्य़ा यात वार्षिक 3 टक्के वेतनवाढ, घरभाडे भत्याचा दर 8, 16, 24 टक्के वाढ, इतर शासकीय कर्मचाऱयांप्रमाणे महागाई भत्ता, दिवाळी बोनस आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़
दापोलीत दुसऱया दिवशीही एसटी संप सुरूच
मौजे दापोलीः दापोली आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचाऱयांनी सेमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. हा संप दुसऱया दिवशी अर्थात मंगळवारीदेखील कायम राहिल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे हाल झाले. एसटी कर्मचाऱयांनी मंगळवारी दिवसभर आगारात जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
दापोली आगारात सोमवारी 10 वाजल्यापासून संप पुकारण्यात आला होता. हा संप दुसऱया दिवशीही कायम राहिला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे आरक्षणही रद्द करून प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्यात आले तर अजूनही प्रवासी आपले तिकीट रद्द करण्यासाठी दापोली आगारात येत आहेत. काही प्रवासी 2 दिवसात गाडय़ा सुरू होतील, या आशेवर आहेत. शासन जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले.
राजापुरात एसटी कर्मचाऱयांचा संप सुरूच
राजापूरः एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संप मिटण्याची शक्यता नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून राजापूर तालुक्यातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. राजापूर एसटी आगाराबाहेर आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱयांना भारतीय जनता पार्टीने जाहीर पाठिंबा दिला असून मंगळवारी आंदोलनकर्त्या कर्मचाऱयांसाठी पाण्याची व्यवस्थाही केली.
राजापूर आगारातून गेले 2 दिवस किरकोळ दोन-चार फेऱया वगळता अन्य फेऱया बंद आहेत. राजापूर शहरात खरेदीसाठी तसेच शासकीय कामांसाठी येणाऱया प्रवाशांना एसटी फेऱया बंद असल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. भारतीय जनता पार्टीने राजापूर एसटी आगाराबाहेर आंदोलनाला बसलेल्या कर्मचाऱयांना पाठिंबा जाहीर केला असून राजापूर एसटी आगाराबाहेर आंदोलनासाठी बसलेल्या कर्मचाऱयांसाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्याकडून पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्यासह कुबडे, पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, अरविंद लांजेकर, संजय ओगले, सोनल केळकर, अशोक पेडणेकर, बच्चू पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगार सेनेच्या पदाधिकाऱयांची पाठ
राजापुरात एसटी कर्मचाऱयांच्या न्याय हक्कासाठी सर्व एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले असताना एसटी कामगार सेनेचा राजापूर आगारातील एक पदाधिकारी मात्र या संपात सहभागी न झाल्याने सर्व एसटी कर्मचाऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे.