प्रतिनिधी/रत्नागिरी
जिह्यात बुधवारी आणखी 590 कोरोनाबाधित सापडले. त्यामुळे जिल्हय़ातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 58 हजार 516 झाली आह़े 429 जणांना कोरोनावर मात केली असून बरे झालेल्यांची एकूण संख्या 50 हजार 983 झाली आह़े बुधवारी 6 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 673 झाली आह़े
बुधवारी आरटीपीआर चाचणीमध्ये 317 तर रॅपिड ऍन्टिजन चाचणीमध्ये 199 असे एकूण 516 तर या आधीचे 74 अशा एकूण 590 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आह़े जिह्याचा पॉझिटिव्हीटी दर 8.36 तर मृत्यूचा दर 2.85 नोंदवण्यात आला आह़े बुधवारी मृत झालेल्यांमध्ये गुहागर, चिपळूण व दापोली तालुक्यामधील प्रत्येकी 2 कोरोनाबाधितांचा समावेश आह़े