प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटीच्या जीएसएस कॉलेजमध्ये इन्स्टिटय़ूशनल इनोव्हेशन सेल (आयआयसी)चे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य भरत शानभाग उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य बी. एल. मजुकर, आयआयसीच्या प्रमुख डॉ. लता लक्ष्मेश्वर उपस्थित होते.
प्रारंभी ऐश्वर्या हिच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य मजुकर यांनी स्वागत केले. डॉ. लता यांनी आयआयसीची माहिती दिली. भरत शानभाग यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी उद्योजक होण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, हे सांगून आजच्या आयटी स्टार्टअप कंपन्यांबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन कल्पना वैज्ञानिक प्रयोग व उपक्रमांना चालना देऊन त्यांना मूर्त स्वरूप देण्यास मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. डॉ. विनय सुणगार यांनी आभार मानले.