मुंबई
वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी रिटर्न भरण्याबाबत केंद्र सरकारने मुदत आता वाढवून दिली आहे. संबंधीतांना जीएसटी रिटर्न 31 जुलैपर्यंत जीएसटी रिटर्न भरता येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येची दखल घेत सरकारने रिटर्नसाठी कालावधी वाढवून दिला आहे. कर दात्यांना जीएसटी आर -4 हा आर्थिक वर्ष 2020-21 संबंधीचा फॉर्म 31 जुलैपर्यंत दाखल करता येणार आहे.