जवळपास 51 टक्क्यांची घसरण
नवी दिल्ली –
देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन निर्मिती कपंनी हिरोमोटो कॉर्पच्या वाहन विक्रीत मे महिन्यात घसरण झाली आहे. मागील महिन्यात 1,83,044 दुचाकींची विक्री झाली जी या वर्षातील एप्रिलमध्ये 3,72,285 युनिटने कमी होत 51 टक्क्यांची घसरण राहिली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशात महामारीच्या कारणास्तव लॉकडाऊनसोबत कंपनीच्या प्रकल्पांमधील काम थांबवले असल्याचे म्हटले आहे. दुचाकी वाहन निर्मितीत अग्रेसर होण्यासोबत 22 एप्रिल रोजी देशभरात आपल्या प्रकल्पांमधील काम थांबविले आहे.
गुरुग्राम, हरिद्वार आणि धारुहेरामध्ये तीन प्रकल्पांमध्ये 17 मेपासून एका शिफ्टमध्ये काम सुरु केले असून त्यानंतर नीमराणा, हलोल तथा चित्तूरचे तीन प्रकल्पांमध्ये 24 तास काम सुरु करण्यात आले आहे.