सांगली/प्रतिनिधी
वित्तीय वर्ष २०१७–१८ साठी जीएसटी वार्षिक विवरणपत्रे जीएसटीआर–९ आणि जीएसटीआर–९ सी दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ही विवरणपत्रे दाखल करताना करदात्यांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेता ही मुदवाढ करण्यात आल्याची माहिती सांगली केंद्रीय जीएसटी कार्यालयातून दिली गेली. राज्यांच्या वेगवेगळ्या गटासाठी अंतिम तारखा, ३, ५ आणि ७ फेब्रुवारी २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अंतिम तारीख ३१ जानेवारी होती.
यामुळे महाराष्ट्र व दक्षिणेची काही राज्ये व काही केंद्रशासित प्रदेश या गटासाठी ३ फेब्रुवारी २०२०, उत्तर – पश्चिमेची काही राज्ये व काही केंद्रशासित प्रदेश या गटासाठी ५ फेब्रुवारी २०२०, तर उत्तर – पूर्वेची तथा पुर्वोत्तर काही राज्ये व काही केंद्रशासित प्रदेश या गटासाठी ७ फेब्रुवारी २०२० अशी मुदत वाढ असेल याची अधिसूचना लवकरच प्रकाशित होणार आहे. तर 2018 -19 या आर्थिक वर्षासाठी अंतिम मुदत 31 मार्च 2020 आहे.
मात्र ज्या जीएसटी करदात्यांची एकूण वार्षिक उलाढाल 2 कोटीच्या आत आहे त्यांना 2017-18 व 2018-19 ची ही वार्षिक विवरणपत्र भरणे अनिवार्य नसून वैकल्पिक आहे.