इमॅन्युएल शार्पेंची, जेनिफर दौडना यांची निवड
वृत्तसंस्था / स्टॉकहोम
रसायनशास्त्रातील संशोधनासाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार इमॅन्युएल शार्पेंची आणि जेनिफर डाउडना यांना देण्यात येणार आहे. जीनोमवरील संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. स्वीडिश वैज्ञानिक अल्प्रेड नोबेल यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांना एक सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (जवळपास 8 कोटी रुपये) दिले जातात. इमॅन्युएल शार्पेंची आणि जेनिफर डाउडना यांनी जीनोमच्या संपादनात महत्त्वाचे संशोधन केले आहे. त्यामुळे त्यांना यंदाचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात येणार असल्याचे निवड समितीने जाहीर केले.