पाटणा : रालोआमधील जागावाटप जाहीर झाल्यावर बिहारमधील राजकीय लढत अधिकच रंगतदार झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी 8 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. तर संजदने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. संजदच्या वाटय़ाला 115 जागा आल्या आहेत. संजदने यावेळी बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी दिलेली नाही. 115 उमेदवारांच्या यादीत सर्व वर्ग आणि समाजाच्या लोकांना स्थान दिले आहे. महिलांनाही मोठय़ा प्रमाणात संधी देण्यात आल्याचा दावा संजदचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. संजदच्या नेत्यांनी यावेळी लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यासंबंधी बोलणे टाळले आहे.
Previous Articleजीनोमवरील संशोधनासाठी दोघांना ‘रसायन’चे नोबेल
Next Article कोरोना लसनिर्मितीत आता अंबानींचेही नाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.