उद्या मुख्यमंत्र्यासोबत शिष्टमंडळाशी चर्चा
प्रतिनिधी/ पणजी
आपल्या विविध मागण्यासाठी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा तयारीत असलेल्या जीवरक्षकांनी पणजी आझाद मैदानावर पोलिसातर्पे अडविण्यात आले. त्यामुळे जीवरक्षकांनी विधासभेवर मोर्चा नेण्यात आला नाही. उद्या शुक्रवारी संपकरी जीवरक्षकाचे पाच जणांचे शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. अल्तिनो येथील मुख्यमंत्र्याचा शासकिय निवास्थानावर सकाळी 9.30 वा. ही बैठक होणार आहे अशी माहिती कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
मागिल चार महिन्यापासून हे जीवरक्षक संपावर आहे. दृष्टी कंपनीकडून कंत्राट काढून घेऊन पर्यटन विकास महामंडळात समावून घेण्याची मागणी या जीवरक्षक करत आहे, पण सरकार याची काहीच दखल घेत नसल्याने काल या जीवरक्षकानी विधासभेवर मोर्चा नेण्याचा नियोजन केले होते. पण पोलिसाना त्यांचा मोर्चा अडवून धरला. त्यामुळे आझाद मैदानावर पोलिस व जीवरक्षकामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कंपनीकडून जीवरक्षाकांची सतावणूक होत आहे. मंत्र्यांना या विषयी विचारायला गेले तर त्या कामगारांचे आम्हाला लागत नाही दृष्टी कंपनी बघून घेणार अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. पूर्ण दिवस काम करुन कुठल्याच मेडिकल सुविधा नाही. कंपनी काहीच जबाबदारी घेत नाही. हे मंत्री या कंपनीचे दलाल झाले आहे, असा आरोप स्वाती केरकर यांनी केला.
या कंपनीचे कंत्राट संपले आहे तरी सरकारने कंपनीला कंत्राट वाढवून दिले आहे. या जीवरक्षकांना पगार दिला जातो तो कंपनी स्वतःच्या खिशातून नाही तर तो सरकारचा पैसा आहे. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे कंपनीची बाजू घेत असून त्यांना जीवरक्षकांचे काहीच पडलेले नाही.
हे जीवरक्षक सर्व स्थानिक गोमंतकीय आहे. सरकारने या गोमंतकीय कर्मचाऱयावर अन्याय केला आहे. या जीवरक्षकांनी अनेक पर्यटकांचा जीव वाचवला आहे. पण जीवरक्षक संपावर गेल्याने आज पर्यटन किनारी सुरक्षा अपुरी पडत आहे. दृष्टी कंपनी अनुभव नसलेले जीवरक्षक आणून पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहे असे कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.
गोवा सुरक्षा मंचचा पाठिंबा
जीवरक्षक हे देशी-विदेशी पर्यटकांचे जीव वाचविण्याचे कार्य करतात म्हणूनच ते खऱया अर्थाने राष्ट्रवादी आहेत. परंतु सरकारला त्यांचे काहीच पडून गेलेले नाही. गेले चार महिने जीवरक्षकांची उपासमार होत आहे. सरकारकडे संघर्ष करण्यासाठी ताकद आजमावी लागते व हे काम एकजुटीने करण्यासाठी यापुढे जीवरक्षकांच्या पाठीशी राहण्यासाठी गोवा सुरक्षा मंचने पुढाकार घेतला आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला असल्याची घोषणा गोवा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी येथील आझाद मैदानावर एकत्रित आलेल्या जीवरक्षकांसमोर सांगितले.