1 लाख 57 हजार रुपये, 15 मोबाईलसह, दोन बाईक जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
बॉक्साईट रोडवरील राजीव गांधीनगर परिसरात अंदर-बाहर जुगार खेळणाऱया 14 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली असून त्यांच्याजवळून 1 लाख 57 हजार 800 रुपये रोख रक्कम, 15 मोबाईल, दोन बाईक जप्त करण्यात आल्या आहेत.
राजीव गांधीनगर परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकला. त्यांच्यावर एपीएमसी पोलीस स्थानकात कर्नाटक पोलीस कायदा 87 व भादंवि 269 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटका ऍपॅडेमिक डिसीज ऍक्ट-2020 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी यासंबंधी माहिती दिली असून रात्री उशिरापर्यंत एपीएमसी पोलीस स्थानकात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. सध्या कोरोना महामारी थोपविण्यासाठी लॉकडाऊन सुरू असतानाही मोठय़ा प्रमाणात जुगार रंगला होता.
समीर राजेखान पठाण (वय 31) रा. बॉक्साईट रोड, नरसिंग जयसिंग रजपूत (वय 32) रा. बापट गल्ली, बाळू अशोक बिराजे (वय 34) रा. बॉक्साईट रोड, विक्की अशोक केसरकर (वय 28) रा. रामनगर, वड्डरवाडी, मत्तीन इमामहुसेन शेखनूर (वय 27) रा. न्यू गांधीनगर, अतिब मेहबूब अत्तार (वय 24) रा. आझादनगर, मतीब विनायक सौंदत्तीकर (वय 23) रा. उज्ज्वलनगर, साकीब हारुण तांबोळी (वय 24) रा. उज्ज्वलनगर, विजय भावकाण्णा देमाण्णाचे (वय 43) रा. किल्ला, विनायक राजू बेन्नाळकर (वय 30) रा. अयोध्यानगर, टिंकू सिद्धाप्पा दोडमनी (वय 31) रा. दुर्गामाता रोड, गांधीनगर, दिनेश लक्ष्मण पाटील (वय 48) रा. आंबेडकरनगर, कंग्राळकर कॉलनी, सिद्धांत सुधीर पाटील (वय 25) रा. काँग्रेस रोड, टिळकवाडी, वासीम बाबाजान खानापुरे (वय 30) रा. गांधीनगर अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱयांची नावे आहेत.