सातारा / प्रतिनिधी :
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर नॉलेज सिटीनजीक सातारा बाजुच्या लेनकडे काही अंतरावर गटारावरील शॉप्ट तुटले आहे. त्या शॉप्टमधील लोखंडी तारा शनिवारी सकाळी गायब केल्या जात होत्या. तो प्रकार नेमका काही नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे महामार्गावर शुकशुकाट असतो. त्याचाच फायदा घेत काही मंडळींकडून महामार्गालगत असलेले लोखंडी अँगल, सूूचना फलक, लोखंडी सळ्या चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.