प्रतिनिधी / वैराग
जुनी पेन्शन हक्क संघटना सोलापूरच्या वतीने डीसीपीएस धारकांची शासनाकडे जमा असलेली रक्कम शेतकऱ्यांसाठी वापरून त्या बदल्यात कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वावरे केली आहे. यावेळी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री शंकरराव गडाख, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, आमदार कैलास पाटील, राज्याचे मुख्य सचिव मिलिंद नार्वेकर आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या निवेदनाची तात्काळ दखल घेण्यास शिष्टमंडळास आश्वासन दिले असल्याचे संघटनेचे मोहन पवार यांनी सांगितले. जुनी पेन्शन संघटनेची आतापर्यंतची निवेदने, विविध दैनिकांमधील बातम्या कात्रणे याचे सविस्तर वाचन करून जुनी पेन्शन संघटनेच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे चर्चेसाठी बोलवले असल्याचे आश्वासन दिले. यावेळी जुन्या पेन्शनचे बार्शी तालुक्याचे सरचिटणीस प्रवीण देशमुख, जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड, बंडू गोरे, विश्वनाथ ढाणे आदीं उपस्थितीत होते. यावेळी बार्शीचे चित्रकार महेश मस्के यांनी तयार केलेले स्केच देऊन जुनी पेन्शन संघटना बार्शी तालुका शाखेच्या वतीने मुख्यमंत्री ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.