प्रवाशांची होणार सोय : पार्किंग समस्येवर काढता येणार तोडगा
प्रतिनिधी/ बेळगाव
सांबरा येथील बेळगाव विमानतळावर दाखल होणाऱया प्रवाशांना पार्किंगची व्यवस्था नसल्याने अनेक समस्या येत होत्या. जून महिन्यापासून विमानतळ परिसरात पे ऍण्ड पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामुळे जे प्रवासी पार्किंगला वाहने लावून प्रवासाला जाणार आहेत. त्यांच्यासाठी हे सोयीचे ठरणार आहे.
विमानाने प्रवास करणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिन्याला 30 ते 35 हजार प्रवासी विमानाने ये-जा करत आहेत. तसेच विमानांच्या संख्येतही वाढ झाली आहे. प्रवासी विमानतळावर ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करत आहेत. एखादा प्रवासी दोन दिवस विमानतळावरच वाहन ठेवणार असेल तर त्याची व्यवस्था नव्हती. तसेच वाहन लावणाऱयांनाही शिस्त नव्हती.
पे ऍण्ड पार्किंगसाठी विमानतळ प्राधिकरणाने निविदा मागविल्या होत्या. एका कंत्राटदाराला या निविदा देण्यात आल्या असून जून महिन्यापासून विमानतळावर पार्किंगची व्यवस्था केली जाण्याची शक्मयता आहे. मागील अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी अखेर पूर्ण होणार आहे.