प्रतिनिधी/ बेळगाव
भारत सरकारने 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 दरम्यान फिट इंडिया फ्रिडम रन मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत जेएनएमसी महाविद्यालयाने दि. 4 सप्टेंबर रोजी फिट इंडिया रनचे आयोजन केले आहे.
प्राचार्या डॉ. एम. एस. महंतशेट्टी यांनी स्वागत केले. काहेर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी मोहिमेचा ध्वज दाखवून शुभारंभ केला. या मोहिमेत 70 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, याशिवाय विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डीन आर. एस. मुधोळ, डॉ. ए. पी. होगाडे, उपप्राचार्य डॉ. रविंद्र होनुंगर, एनएसएसच्या समन्वयिका अश्विनी नरसण्णावर आदी उपस्थित होते.